व्यवयास करण्यासाठी सुलभता (Ease of doing business) या विषयाबाबतचे शासनाचे धोरण लक्षात घेऊन या संदर्भात दि. १८.०९.२०१५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार चित्रपट, टि. व्ही. मालिक, जाहिरातपट व माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या सुलभरीतीने व ठराविक मुदतीमध्ये मिळाव्यात यादृष्टिने एक खिडकी योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. या संस्थांनी https://www.filmcell.maharashtra.gov.in/sws/ या संकेतस्थळावर त्यांच्याकडील चित्रीकरणासाठी उपलब्ध स्थळे घोषित केली असतील त्याची खिडकी योजनेंतर्गतची व्यवस्था लागू करणे शक्य होईल. तथापि जि स्थळे https://www.filmcell.maharashtra.gov.in/sws/ (महाराष्ट्र फिल्मसेल) या संकेतस्थळावर उपलब्ध असणार नाहीत वा कायद्यान्वये चित्रीकरणास मर्यादित/प्रतिबंधित केली आहेत, अशा स्थळांसाठी त्या संबंधित संस्थेची चित्रिकरणासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल.
डाउनलोड करा